त्यांना कोहलीची प्रतिमा कलंकित करायचीय, क्लार्कनेही केली विराटची पाठराखण

12

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीम इंडियासारख्या ‘नंबर वन’ संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहली मैदानात कठोर व कडक वागत असेल तर ते समर्थनीयच आहे. कारण संघाला ‘टॉप’वर ठेवण्यासाठी कर्णधाराचा स्वभाव असाच लागतो. त्यामुळे काही ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी त्याच्यावर केलेल्या बोचऱ्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाहीय. आमच्या मीडियातील काही मंडळी विराटची प्रतिमा कलंकित करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने विराटची पाठराखण केली आहे.

स्मिथही मीडियाच्या टीकेशी सहमत नसेल!

बंगळुरूत जे घडले त्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने विराटशी डोनाल्ड ट्रम्प यांच्या केलेली तुलना मलाही पटलेली नाही. किंबहुना ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथही या टीकेशी सहमत नसेल असे मला वाटते, असेही क्लार्कने स्पष्ट केले.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या