पतीला लॉटरी लागली नाही; पत्नीने नशीब आजमावताच झाली कोट्यधीश!

अनेकजण झटपट श्रीमंत होण्यासाठी लॉटरीचे तिकीट काढतात. काही जणांना त्यात यश येते. तर अनेकजण अपयशी होतात. अनेकदा नशीब आजमावूनही लॉटरी लागली नसल्याने एक व्यक्ती निराश झाला होता. त्यामुळे त्याच्या पत्नीने नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आणि तिने लॉटरीचे तिकीट काढले. आश्चर्य म्हणजे तिला पहिल्या प्रयत्नांतच तिला दोन कोटींची लॉटरी लागली आहे. त्यामुळे ती महिला अचानक कोट्यधीश झाली आहे. ही घटना अमेरिकेच्या मिशिगनमध्य घडली आहे.

मिशिगनमधील मुनरो काऊंटी असे लॉटरी लागलेल्या महिलेचे नाव आहे. आपल्याला एवढ्या मोठ्या रकमेची लॉटरी लागेल, असे स्वप्नातही वटले नव्हते, असे त्यांनी सांगितले. मात्र, पहिल्यांदाच आपण घेतलेल्या लॉटरीच्या तिकीटाला जॅकपॉट लागला असून आपल्याला सुमारे 2 कोटींची रक्कम लॉटरीत लागल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या पतीने अनेकदा लॉटरी काढून नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे सहजच आपण एकदा नशीब आजमावून पाहवे, असा विचार मनात आता आणि केन गेन लॉटरीचे तिकीट घेतल्याचे मुनरो यांनी सांगितले.

लॅम्बर्टविलेमध्ये क्रोअर स्टोअरमध्ये गेले असताना केन गेम या लॉटरीकडे आपले लक्ष गेले आणि आपण त्यात सहभागी झालो. लॉटरी घेऊनही अपयश येत असल्याने पतीने लॉटरीचे तिकीट घेणार नाही, असे ठरवले होते. तर एकदा नशीब आजमावण्याचा निर्णय आपण घेतला होता. तसेच तिकीटासाठी लागणारे पैसे आपल्याजवळ होते. त्यामुळे आपण एक तिकीट विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले.

तिटीट विकत घेण्यासाठी आपण स्वतःचा जन्मदिवस ,मुलांच्या जन्मदिवस असलेली संख्या निवडली आणि ती आपल्याला लकी ठरली आहे. आपल्याला दोन कोटींच्या लॉटरी लागली आहे, असे पतीने सांगितल्यावर त्यावर आपला विश्वासच बसला नाही. आपण तिकीटाचा नंबर आणि विजेता नंबर अनेकदा पडताळून पाहिला आणि खरेच मला जॅकपॉल लागला होता. हा आपल्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. लॉटरीची रक्कम घरासाठी खर्च आणि निवत्तीनंतरच्या योजनेसाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला लॉटरी लागल्याने पतीलाही आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या