सलमाननंतरच मी लग्न करेन – मिका सिंग

अभिनेता सलमान खानचे लग्न झाल्यानंतर लग्न करणार असल्याचे गायक मिका सिंगने जाहीर केले आहे. इंडियन प्रो म्युझिक लीगच्या मंचावरून मिकाने केलेल्या घोषणेने साऱयांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मिकाने म्हटलंय, मी लग्नासाठी मुलगी शोधत आहे. कदाचित या शोमध्ये मिळू शकेल, पण मी लग्न तेव्हाच करेन, जेव्हा सलमान खान लग्न करेल. तोपर्यंत मी माझ्या बॅचलर आयुष्याचा आनंद घेतोय. सलमाननंतर मी इंडस्ट्रीचा एकमेव फॉरएव्हर बॅचलर आहे. हा टॅग मी कायम ठेवू इच्छितो.

सध्या झी टीव्हीवर इंडियन प्रो म्युझिक लीग सुरू झालंय. यामध्ये मिका सिंग, वैलास खेर, साजिद खान, शान, अंकित तिवारी, जावेद अली, असीस कौर, भूमी त्रिवेदी, आकृती कक्कर, पायल देव, नेहा भसीन, शिल्पा राव आदींचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या