दोन ट्रकमध्ये दुधाची गाडी चिरडली, दोघांचा मृत्यू

29

सामना ऑनलाईन, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावर एक विचित्र अपघात झाला. दोन ट्रकमध्ये एक दुधाचा टेम्पो अक्षरश: चिरडला गेला. या दुर्घटनेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पुसद इथे नेण्यात आले आहे. पैनगंगा नदी पुलाजवळ (हदगाव जिल्हा,नांदेड हद्द ) सकाळी ६ वाजता ही दुर्घटना घडली.

आपली प्रतिक्रिया द्या