Video : गर्दीत अभिनेत्रीचे केस पकडले अन् जबरदस्ती घेतले चुंबन, पतीने केली सुटका

सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क

हिंदुस्थानमध्ये बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्रींबाबतची क्रेझ आपण पाहिले आहे. परंतु विदेशातील चाहते देखील काही कमी नाही. हॉलिवूडची गायीका आणि अभिनेत्री मायली सायरस हिच्यासोबत काही दिवसांपूर्वी गैरवर्तनाचा प्रकार घडला. गर्दीमध्ये एका व्यक्तीने तिच्यासोबत गैरवर्तन केले आणि केस पकडून जबरदस्ती चुंबन घेतले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री मायली सायरस ही स्पेनमधील बार्सिलोना येथे प्रिमावेरा साऊंड फेस्टीव्हलमध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिचा पती लियाम हेम्सवर्थही उपस्थित होता. यावेळी पत्रकार आणि गर्दीने घेरलेली मायली कारकडे जात असतानाच एक व्यक्ती तिचे केस पकडलो आणि तिचे चुंबन घेतो. गर्दीमध्ये आपल्यासोबत नक्की काय घडले हे तिच्या लक्षात येत नाही. परंतु हा प्रकार तिच्या पतीच्या लक्षात येतो आणि तो तिला कवेत घेऊन सुरक्षित कारपर्यंत घेऊन जातो.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्याच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. अनेकांनी मायलीला त्या व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार करण्याचा आणि कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे.