संजय निरुपम यांना हटवले, मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी वर्णी

40

सामना ऑनलाईन । मुंबई

विद्यमान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना जोरदार धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस श्रेष्ठींनी संजय निरुपम यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवून या जागी मिलिंद देवरा यांची नेमणूक केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली असून तसे प्रसिद्धीपत्रक पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्ध केले आहे.

दरम्यान, निरुपम यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्यात आले असले तरी पक्षाने त्यांचे प्रसिद्धपत्रकामध्ये कौतुक केले, तसेच त्यांच्या इच्छेनुसार मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसची 26 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील एकमेव उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या