तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर

देशातील प्रतिष्ठत आणि श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेना सचिक मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनंतर मिलिंद नार्वेकर यांची ट्रस्टचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. देशभरातून 24 व्यक्तींची तिरुपती देवस्थान ट्रस्टवर नियुक्ती करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती देवस्थान देशातील सर्वात प्रतिष्ठत असे देवस्थान आहे. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ लागलेली असते. यासाठी प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री नावाची शिफारस आंध्र प्रदेश सरकारकडे करतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री काय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्याकडे महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली होती. त्याप्रमाणे आंध्र प्रदेश सरकारने बुधवारी यासंदर्भातील अधिसूचना काढत नार्वेकर यांची तिरुपती देर्वेस्थान ट्रस्टचे सदस्य म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.

शिवसेना सचिक मिलिंद नार्वेकर यांच्याकडे मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमियर लीग (MPL) आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या