प्रसिद्ध अभिनेत्याचा चीन वस्तूंवर बहिष्कार; टीकटॉक अकाऊंट केले डिलीट

4970

देशात सध्या चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. टिक टॉक या सर्वाधिक वापरल्या जाणारे चीनी अॅप्लिकेशन अनेकांनी मोबाईलमधून हटवले आहे. याच पार्श्वभुमीवर प्रसिद्ध अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण याने देखील चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे. त्याने त्याचे टिकटॉक अकाऊंट डिलीट केले आहे.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर थ्री इडियट फेम प्रसिद्ध इंजिनियर सोनम वांगचूक यांचा चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला असे सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘माझा मोबाईल चीनमध्ये बनलाय. येत्या एक आठवड्यात मी तो बदलतोय. आणि येत्या वर्षभरात मी माझ्या आयुष्यातील सर्व चीनी वस्तूंचा वापर बंद करणार आहे. चीन लोकांशी चीनशी आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही तर चीनी सरकारच्या वागणूकीचा आहे. मी पण तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या परिसरात, शहरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी जनजागृती करा. मी नेहमी बोलत आलो आहे की 21 व्या शतकात जीव द्यायचा नाही तर जीवन देण्याची गरज आहे’, असा संदेश वांगचूक यांनी व्हिडीओतून दिला होता. त्यांचा हा व्हिडीओ संदेश शेअर करत मिलिंदने चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या