दुधात घाला तूप, ‘शक्ती’ मिळेल खूप

आपण दुधामध्ये हळद टाकून पिण्याचे फायदे अनेकदा ऐकले असतील.पण आज आम्ही तुम्हाला दुधामध्ये तूप टाकून पिण्याचे फायदे सांगणार आहोत. रोज रात्री दूध आणि तुपाचे एकत्रित मिश्रण प्यायल्याने तब्येत उत्तम राहण्यास मदत होते. दुधामध्ये तूप घालून प्यायल्यास त्याचे बरेच फायदे होतात. पचनक्रिया सुधारण्याबरोबर शारिरीक ताकद वाढवण्यासाठीही हा उपाय मदत करणारा ठरतो.

आयुर्वेदामध्ये तुपाला असलेलं महत्त्व आपण जाणतोच, दूध पिण्याचे फायदेही आपल्याला माहिती आहेत. मात्र या दोन्हीचे मिश्रण हे गुणकारी, लाभकारी तब्येतीसाठी वरदायी ठरते. दूध, तुपाचे मिश्रणाच्या सेवनाचे फायदे कोणते आहेत ते पाहूयात.

ghee

जर तुम्हाला सलग काम करण्यामुळे थकवा जाणवत असेल,तर या मिश्रणाचे सेवन करून पाहाच. दूध आणि तुपाचे एकत्रित सेवन केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि ताकद वाढण्यास मदत होते.

health-fitness

व्यायाम करून शरीर पिळदार करण्यासाठी किंवा पैलवान बनण्यासाठी कष्ट करणारी मंडळीही या मिश्रणाचे सेवन करतात.

cold-health

सांधेदुखीचा त्रास होत असेल तर हा त्रास कमी करण्यासाठी हे मिश्रण मदत करते. तुपामुळे सांध्यातील स्निग्धता निर्माण होण्यास मदत होते, तसेच सूज दूर होण्यासही मदत होते असं म्हणतात. दुधामुळे हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. यामुळे सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी एक ग्लास दुधात एक चमचा गायीचे तूप मिसळून त्याचे सेवन केल्यास आराम पडतो असं म्हणतात.

stomach-pain

दूध आणि तूप एकत्रित घेतल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. या मिश्रणामुळे पचण्यास जड असलेले पोटातील पदार्थ शरीराबाहेर फेकण्यास मदत होते. पचनशक्ती कमजोर झालेल्यांना तसेच बद्धकोष्ठाचा त्रास असलेल्या व्यक्तींना दुधामध्ये तूप मिसळून त्याचे सेवन करण्याचा बरेचदा सल्ला दिला जातो.

health
गायीच्या तुपामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडंट,एंटीबॅक्टेरीअल आणि एंटीफंगल गुण असतात. तुपामुळे शरीराला पोषक तत्वे मिळतात तसेच आणि फॅट अॅसिडचे प्रमाणही कमी असते.

sex-city

दुधामध्ये तूप मिसळून प्यायल्यास पुरुषांची लैंगिक ताकद वाढते असंही सांगितलं जातं. या मिश्रणामुळे वीर्याचे उत्पादन वाढण्यासही मदत होते. दूध आणि तूप एकत्रित करून प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

आपली प्रतिक्रिया द्या