दूधवाल्याने बनवला बसपा नेत्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ, ब्लॅकमेल करून वारंवार बलात्कार

91

सामना ऑनलाईन । गाझियाबाद

बसपा नेत्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवून त्या आधारे ब्लॅकमेल करत वारंवार बलात्कार केल्याची घटना गाझियाबाद येथे घडली आहे. या घटनेतील आरोपी हा दूधवाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित वर्मा असं या आरोपीचं नाव आहे. गाझियाबादमधील कविनगर परिसरात बसपा नेता त्याच्या कुटुंबासोबत राहतो. त्याच्या घरी रोहित गेला काही काळ दूध देण्याचं काम करत असे. त्याने एक दिवस नेत्याच्या पत्नीला गाडीत बसवलं आणि शीतपेयातून गुंगीचं औषध पाजलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिचा अश्लील व्हिडीओही बनवला. या व्हिडीओच्या साहाय्याने रोहित पीडितेला धमकावू लागला. त्याने व्हिडीओ व्हायरल करायची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्याने तिच्यावर लग्नासाठी दबाव आणायला सुरुवात केली. तिने नकार दिल्यानंतर त्याने पुन्हा तिच्या मुलाला जिवे मारण्याची आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

या सगळ्याचा ताण असह्य होऊन पीडितेने तिच्या पतीला घडलेली सर्व हकिकत सांगितली. बसपा नेत्याने त्वरित पोलीस स्थानक गाठत रोहितविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी रोहितला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या