दूधवाल्याने केला विधवेचा खून, १५ दिवसांनी गुन्हा उघडकीस

सामना ऑनलाईन । पुणे 

लाईक कराट्विट करा

उसने दिलेले पैसे मागणाऱ्या विधवा महिलेचा निघृण खून करून तिचे प्रेत पुणे शहरातील मुळा- मुठा नदीत फेकणाऱ्या दूधवाल्याला पुणे पोलीसांनी जेरबंद केले आहे. तब्बल १५ दिवसांनी ही घटना उघडकीस आली आहे.

कमल वसंत शिंदे या विधवा महिलेने संतोष हंडगरा या दूधवाल्याला उसने पैसे दिले होते. कमल यांनी वारंवार पैशासाठी तगादा लावल्याने संतापलेल्या संतोषने तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. नंतर तिचा मृतदेह मुळा-मुठा नदीत फेकून दिला. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी याप्रकरणी दूधवाल्याचा धंदा करणाऱ्या संतोष हंडगरा याला अटक केली आहे.