
अनेकदा भिकारी व्यक्ती बघून आपला हात आपोआपच खिशाकडे जातो आणि त्याच्या झोळीत आपण पैसे टाकतो असा भिक मागणारा व्यक्ती बंगल्यात राहतो आणि करोडपती असल्याचं कळाल तर आपल्याला जसं आश्चर्य वाटेल, तसाच एक प्रकार मध्य प्रेदशात घडला आहे. मध्य प्रदेश सरकारकडून गरीबांचं पूनर्वसन करण्याची योजना राबवली जात असताना ही माहिती उघड झाली.
रमेश यादव असे नाव असलेला भिकारी गेल्या काही वर्षांपासून भिक मागतो. तो इंदूर येथे कालका माता मंदिराच्या परिसरात दिसायचा. त्याची विचारपूस केल्यानंतर त्यांना कळालं की या वक्तीचं लग्न झालेलं नाही, पण त्याचे बरेच नातेवाईक आहेत. टीम त्याच्या घरी पोहोचल्यावर त्याच्या घरातील इंटिरिअर पाहून दंग झाली. जवळपास चार लाख रुपयाचं साहित्य घरात लावले आहे. यामध्ये एसी वैगरे सुविधा आहेत. आलिशान, सोयीसुविधा असलेला बंगला आहे. मात्र एका व्यसनामुळे तो भिक मागत फिरतो अशी माहिती टीमला मिळाली.
रमेश यादवला दारू पिण्याची सवय आहे. तो करोडपती आहे, पण ही संपत्ती पूर्वजांनी कमावलेली आहे. त्याला थेट उत्पंनाचा स्त्रोत नाही. त्यामुळे दारू पिण्यासाठी तो भिक मागत होता. आता सरकारी योजनेअंतर्गत समूपदेशन करण्यात आल्यानंतर तो व्यसन सोडून काम करण्यासाठी तयार झाल्याचं सांगण्यात येत आहे. तो आता वॉलेंटियर म्हणून काम करण्यास तयार आहे.