कोट्यधीश असूनही महिला खाते कॅटफूड; म्हणतेय याने पैसे वाचतात!

जगात अनेकजण श्रीमंत आहेत. अगदी कोट्यधीश आहेत. पण, काही जण पैसे असूनही भयंकर कंजुषपणा करतात. याचाच प्रत्यय अमेरिकेतील एका महिलेकडे बघून येऊ शकतो. कारण, तिने पैसे वाचवण्यासाठी चक्क मांजरींना देतात ते कॅटफूड खाल्लेलं आहे.

या महिलेचं नाव ऐमी एलिजाबेथ असं आहे. 50 वर्षांची ही महिला अमेरिकेतील लासवेगस येथे राहते. या महिलेकडे प्रचंड संपत्ती आहे. पण, ऐमी नेहमी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करते.

ऐमी ही तिचा पती मायकलपासून वेगळी राहते. ती राहते ते घर आणि घरासाठी लागणारे पैसे मायकल देतो. त्यामुळे ती कित्येक डॉलर्स वाचवू शकते. ती स्वतःसाठी अजिबात खरेदी करत नाही. जिथे गरज नाही तिथे पैसे खर्च करू नये हा व्यवहारीपणा तिने पाळला आहे. एका जाहीर कार्यक्रमात तिने आपल्या श्रीमंतीचं रहस्य उलगडून सांगितलं तेव्हा या व्यवहारीपणामागची अजून एक किळसवाणी गोष्ट तिने सांगितली.

ती म्हणाली की, कधीकधी तिने वाणसामानाचे पैसे वाचवण्यासाठी मांजरींना देतात ते कॅटफूडही खाल्लं आहे. इतकंच नव्हे तर घरी आलेल्या पाहुण्यांनाही तिने कॅटफूड खायला घातल्याचा खुलासा तिने या जाहीर कार्यक्रमात केला आहे.

या व्यतिरिक्त तिने जुनीच गाडी वापरणं, पाण्याचा मोजून वापर करणं अशाही गोष्टी केल्याचं ऐमीने कबूल केलं आहे. यामुळे तिची संपत्ती आता कोट्यवधी रुपयांमध्ये गेली आहे, असंही तिचं ठाम म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या