कश्मीरमध्ये दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत हिंदुस्थानविरोधी घोषणा

60

सामना ऑनलाईन। श्रीनगर

कश्मीरमधील चकमकीत जवानांनी ज्याला कंठस्नान घातले त्या अकीब भट या दहशतवाद्याला स्थानिकांनी शहीद ठरवले असून सोमवारी त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली.यावेळी हिंदुस्थान मुर्दाबाद,अकीब जिंदाबाद अशी घोषणाबाजी करत स्थानिकांनी स्वतंत्र कश्मीरची मागणी केली.

जम्मू-कश्मीरमध्ये शनिवारी सुरक्षा दलाचे जवान आणि हिजबूल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली होती.पंधरा तास सुरु असलेली ही चकमक रविवार सकाळपर्य़त सुरु होती. ज्या घरात दहशतवादी लपले होते.जवानांनी ते घरच उडवले होते.यात एक पोलिस शहीद आणि एका मेजरसहीत सहाजण जखमी झाले होते. तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.यातील एकाचे नाव अकीब भट उर्फ मौलवी होते तर दुसऱयाचे नाव सौफुल्लाह इलियास ओसामा असे होते. तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबधित होता.

अकीब याचे स्थानिकांशी थेट संबंध असल्याने सोमवारी त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली.या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. यात महिला आणि लहान मुलेही होती.  यावेळी अकिबने स्वतंत्र कश्मीरसाठी आपला प्राण दिला असून तो शहीद झाला आहे अशी घोषणाबाजी करत स्थानिकांनी हिंदुस्थानविरोधात नारेबाजी केली.

हिजबुलचा दहशतवादी बुरहान वाणी याचा जवानांनी खात्मा केल्यानंतर अशाच प्रकारे त्याचीही अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर उसळलेल्या दंगलीत जवानांसह अनेक नागरिक जखमी झाले होते तर कहीजण ठार झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या