एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षाला न्यायालयीन कोठडी

25

सामना ऑनलाईन । नांदेड

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांची हाणामारी प्रकरणी १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. काँग्रेस आणि एमआयएममध्ये तीन दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती. या प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात हत्येचा प्रयत्न करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी सय्यद मोईन यांना अटक करुन दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवले होते. त्यानंतर सय्यद मोईन यांना आज नांदेड जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सय्यद मोईन यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या