डबेवाल्यांच्या रोटीबँकला गोदरेजच्या‘छोटूकूल’ची मदत

सामना ऑनलाईन।मुंबई

भुकेल्यांना अन्न मिळावं या उदात्त हेतूने मुंबईचे डबेवाले गेलं वर्षभर झटत आहेत. लग्न समारंभात, घरघुती कार्यक्रमात अनेकदा अन्न उरतं,ते अनेकजण फेकून देतात. या लोकांना डबेवाले आवाहन करतात की अन्न उरलं तर ते आम्ही घेऊन जाऊ. हे अन्न भुकेल्यांना दिलं जातं. मात्र अनेकदा हे अन्न खराब होतं, असं होऊ नये म्हणून गोदरेजने या डबेवाल्यांना मदत केली आहे.

godrej-new

गोदरेजने‘छोटूकूल’ नावाचं उपकरण तयार केलंय. हा एक सायकलवर बसवता येतो आणि हा कुलर एकदा चार्ज झाला तर वीजेशिवाय तीन ते चार तास थंडावा निर्माण करू शकतो. या कुलरमुळे अन्न खराब होण्यापासून वाचवता येऊ शकते.

गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख कमल नंदी यांनी आपण या उपक्रमाला सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेऊन पाठिंबा देत असल्याचं सांगितलं. डबेवाल्यांच्या संघटनेचे सचिव सुभाष तळेकर यांनी सांगितलं की गोदरेजच्या या मदतीमुळे अन्न वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल आणि अधिकाधिक गरजूंना अन्न देणं शक्य होईल