मुंबई- गोवा महामार्गावर ढोंबी गावाजवळ शिवशाही, मिनिडोअर अपघात 6 जखमी

16

सामना प्रतिनिधी । पेण

शिवशाहीची अपघाताची मालिका सुरुच असून मुंबई- गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील ढोंबी गावाजवळ मिनिडोअरला शिवशाही बसने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मिनिडोअर मधील दोघेजण तर शिवशाही मधील चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

मुंबई- गोवा महामार्गावरुन जाणारी मिनिडोअर रिक्षा क्रमांक एम.एच.06 एस. 4824 ही ढोंबी गावाजवळ आली असता पाठीमागून येणारी शिवशाही बस क्रमांक एम.एच.04 एच. वाय. 9782 ने धडक दिली व शिवशाही बस रस्त्याच्या खाली पलटी झाली. या अपघातात मिनिडोअर चालक वासुदेव ठाकूर वय 56 राहणार पांडापुर, ता. पेण, रोहीत पाटील वय 33 राहणार पांडापुर ता.पेण मिनिडोअर मधील प्रवासी जखमी झाले. तर शिवशाही बस मधील भक्ती उसलोडंकर, निवोदिता मोहन, विकास पोकळे, सुमन माळी हे प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना गडब रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शिवशाही बसचा चालक महमद अली तळघरकर वय 32 राहणार सोडेघर, ता. दापोली, जि. रत्नागिरी यास वडखळ पोलिसांनी अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या