राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते विधवांना दीडशे गायींचे वाटप

1556

जालना परिसरातील 150 विधवा महिलांना उत्पन्नाचे साधन म्हणून विनामूल्य प्रत्येकी एका गायीचे वाटप पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास राज्यमंत्री अर्जुनखोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रज्वाल जातीच्या या संकरित गायींचे वाटप करण्यासाठी अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत जालना कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित कार्यक्रमास शेष महाराज गोंदीकर, बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, सैन्याकडून घेतलेल्या दोनशे गायींपैकी 50 गायी सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्त भागात पाठविण्यात आल्या आहेत. यापैकी दीडशे गायी जालना विधानसभा मतदार संघात विनामुल्य वाटप करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ग्रामीण भागातील विधवा महिलांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे विधवा महिलांना आर्थिक उत्पन्न मिळेल आणि त्यांचा चरितार्थ चालण्यास मदत होईल. गायींच्या वाहतुकीचा खर्च सुध्दा या महिलांकडून घेण्यात आलेला नाही. प्रारंभीच्या काळात मदत म्हणून प्रत्येक गायीसाठी एक पोते पशुखाद्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या