माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांची प्रकृती गंभीर, लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवले

1415

उत्तर प्रदेशचे मंत्री आणि टीम इंडियाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांनी प्रकृती आणखी खालावली आहे. त्यांच्यावर गुरुग्राम मधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी त्यांची किडनी फेल झाल्याने त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

चेतन चौहान यांची जुलै महिन्यात कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची तब्येत खालावली असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.

चेतन चौहान हिंदुस्थानच्या क्रिकेट संघातील प्रमुख फलंदाज राहिले आहे. त्यांनी हिंदुस्थानसाठी 40कसोटी लढती खेळल्या. यात त्यांनी 2084 धावा केल्या.क्रिकेट कारकिर्दीनंतर त्यांनी राजकारणाच्या मैदानात उडी घेतली. ते भाजप कडून लोकसभेवर देखील गेले होते. 1991 आणि 1998 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. आता ते यूपीमध्ये आमदार आणि सरकारमध्ये मंत्री आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या