नैसर्गिक आपत्तीत मृत व्यक्तीच्या वारसांना सहकार राज्यमंत्री पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप

64

सामना प्रतिनिधी । जळगाव 

धरणगाव तालुक्यातील एकलग्न येथे नैसर्गिक आपत्ती मुळे मृत कमलाबाई बापू भिल यांचे पती बापू  पौलाद भिल यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सानुग्रह अनुदान  शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  ४ लाखाचा धनादेश देण्यात आला.

३१ डिसेंबर २०१८ रोजी बापू पौलाद भिल  यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांच्या पत्नी कमलाबाई भिल यांचा आगीत भाजून मृत्यू झाला होता. मृतांच्या वारसांना तत्काळ सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी तहसीलदार राजपुत यांना पंचनामे करून सानुग्रह अनुदान मंजूर करण्याचे सूचित केले होते. यानुसार तलाठी यांनी १ जानेवारी रोजी पंचनामा करून मंडळ अधिकारी यांनी ३ जानेवारी रोजी तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. यानुसार तहसिलदार राजपुत यांनी मयताच्या वारसांना ४ लाखांचे संग्रह अनुदान मंजूर केले होते.

एकलग्न या गावी जाऊन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ४ लाखाचा धनादेश बापू पौलाद भिल या शेतकर्‍याला देण्यात आला. सदर शासकीय मदत केलेल्या शासकीय  मदतीतुन  बैलजोडी व शेतीची अवजारे खरेदी करावी व घरासाठी तसेच  मुलांच्या शैक्षणिक कामी खर्च करावा असे नम्र आवाहन सहकार राज्यमंत्री  गुलाबराव पाटील यांनी केले.

महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीत पूर, अतिवृष्टी, गारपीट, आकस्मित आग, चक्रीवादळ,  दरड कोसळणे, समुद्राचे उधाण व भूकंप या नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या किंवा जखमींच्या वारसांना तसेच वादळी वारा व गारपिटीमुळे झालेल्या कुटुंबियांच्या वारसांना सहाय्यक सानुग्रह अनुदान देण्यात येते. यावेळी तहसीलदार राजपूत,  सरपंच मंगल पाटील, पोलीस पाटील विजय पाटील, उत्तम पाटील, गयभू पाटील, ग्रामसेवक वैशाली पाटील, तलाठी कांचन वाणी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या