कृषिमंत्री फुंडकर यांची आळंदी मंदिरास भेट

सामना प्रतिनिधी । आळंदी

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी व फलोद्यान मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी फुंडकर यांनी आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचेसह पक्षाचे पदाधिकारी यांचे समवेत येथील विविध प्रश्नावर चर्चा केली. आळंदीतील विकास कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याची त्यांनी यावेळी ग्वाही दिली. त्यासाठी पालिकेने मात्र तात्काळ विविध विकासाच्या कामांचे सभागृहातील मंजूर ठरावांप्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे सूचना त्यांनी दिल्या. आळंदीत पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री फुंडकर यांचे स्वागत करून श्रींची प्रतिमा देत सत्कार करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या