जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

2126

राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. याबाबत शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. तसेच शंकरराव गडाख यांनी देखील ट्विट करून याची माहिती दिली आहे.

याबाबत माहिती देताना शंकरराव गडाख म्हणाले आहेत की,

 

आपली प्रतिक्रिया द्या