निवडणुकीच्या वादातून १३ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार

15

सामना ऑनलाईन । रांची

झारखंडच्या पाकूर जिल्ह्यामध्ये १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गावातील निवडणुकीच्या वेळी कुटुंबाने मत न दिल्याने त्याचा राग मनात ठेवत मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ८ जानेवारीपासून बेपत्ता होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जंगलामध्ये मुलीचा मृतदेह सापडला.

पोलिसांनी याप्रकरणी प्रेमलाल हांस्दा, सॅमुअल हांस्दा, कत्थी हांस्दा आणि शिशु हांस्दा या एकाच कुटुंबातील चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी प्रेमलाल याची पत्नी पंचायत निवडणुकीसाठी उभी होती. मात्र त्यामध्ये तिचा पराभव झाला. त्यामुळे आरोपीच्या कुटुंबाने मृत मुलीच्या कुटुंबाला दोषी ठरवलं. त्यानंतर हाच राग मनात ठेवत आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी मुलीला पळवलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपींनी तिची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून दिला. पोलिसांनी याप्रकरणाची अधिक चौकशी केली असतचा आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या