अल्पवयीन मुलीला फूस लावून अज्ञाताने पळवले, गुन्हा दाखल

664

शिरुर अनंतपाळ तालूक्यातील मौजे कारेवाडी येथील 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष मोरे यांना एक 15 वर्षाची मुलगी आहे. ती आपल्या आईसोबत शाळेत खिचडी बनवण्यास जायची. 9 जानेवारी रोजी शाळेत खिचडी बनवण्यासाठी गेली होती. घरी जाते असे सांगून ती शाळेतून निघाली. परंतु ती घरी पोहोचलीच नाही. सुभाष मोरे आणि त्यांच्या पत्नीने आपल्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ती सापडली नाही. अखेर त्यांनी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अल्पवयीन मुलीला पळवण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या