प्रेम प्रकरणाची माहिती घरच्यांना देण्याची धमकी, अल्पवयीन मुलीला ‘ब्लॅकमेल’ करत लैंगिक अत्याचार

3294

पेण तालुक्यातील रोडे -काश्मीरे येथील एका तरुणाने अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे पेण तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

रोडे -काश्मीरे येथील रहिवासी प्रशांत सदाशिव पाटील याने अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री केली. सदर अल्पवयीन मुलगी 11 मार्च 2020 रोजी काॅलेजवरून एकटीच पायी येत असतांना तिचा पाठलाग केला व तिला तिच्या प्रेम प्रकरणाबाबत आई- वडिलांना सांगेन असे धमकावून तिला ब्लॅकमेल केले. यावेळी सदर आरोपीने अल्पवयीन मुलीला हायवेवरील हाॅटेलवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला, अशी फिर्याद पीडित अल्पवयीन मुलीने पेण पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

पेण पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एन. पिंपळे यांनी आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, व 12 अन्वये 376, 323, 341, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या