बाथरूममध्ये जीव गुदमरला, गॅस गिझरमुळे मुलीचा मृत्यू

2569

गिझर वापरणे एका अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतले आहे. गॅस गिझरमुळे बाथरूममध्ये जीव गुदमरून मुंबईतल्या ध्रुवी गोहिल या 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

ध्रुवी गोहिल ही मुलगी बोरिवलीची रहिवासी आहे. 5 जानेवारी रोजी तिचा वाढदिवस होता. सकाळी पावणे सातच्या सुमारास ती आंघोळीला गेली. तिला केस धुवायचे होते म्हणून तिला जास्त वेळ लागणार होता. आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी तिने गिझर सुरू केला. तेव्हा बाथरूम पूर्ण बंद होते. थंडी वाढल्यामुळे घरच्यांनी बाथरूममधील झडपा बंद केल्या होत्या.  गिझरमध्ये पाणी गरम करण्यासाठी गिझर बंदिस्त भागातील पूर्ण ऑक्सिजन शोषून घेतो. त्यामुळे ध्रुवीला श्वास घेण्यात अडचण झाली. तिने आरडाओरड केला परंतु बाहेर आवाज न गेल्यामुळे तिच्या कुटुंबीयांना कळलेच नाही. ध्रुवी बेशुद्ध होऊन खाली कोसळली. पावणे सातला आंघोळीला गेलेली मुलगी आठ वाजले तरी बाहेर आली नाही, म्हणून तिचे घरचे घाबरले. अखेर दरवाजा तोडून पाहिले तेव्हा ती बेशुद्ध होऊन खाली पडली होती. तसेच गरम पाणी अंगावर सांडल्याने ती भाजली होती.

ध्रुवीला तत्काळ मंगलमूर्ती इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवले. परंतु ध्रुवीने 75 मिनिटे श्वास घेता न आल्याने तिच्या मेंदूवर आघात झाला होता. शुक्रवारी उपचारांदरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 10 जानेवारी रोजी ध्रुवीचा वाढदिवस होता. तिचे वडील पुण्यात कामाला होते. ते दर शनिवारी रविवारी आपल्या मुलांना भेटायला येत असत. बाबा वाढदिवसानिमित्त घरी आले म्हणून ती खूश होती. परंतु त्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या