टिकटॉक फ्रेंडला भेटण्यासाठी अल्पवयीन मुलीने सोडले घर

399

टिकटॉकवर ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी 13 वर्षांची विद्यार्थिनी घरातून पळून गेली  आहे. तिला चारबाग रेल्वे स्थानकात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर बालकल्याण समितीकडे पाठवले आहे. नोएडा येथे राहणार्‍या मुलीला पालकांनी स्मार्टफोन घेऊन दिला होता. ही विद्यार्थिनी अभ्यास सोडून स्मार्टफोनवर अधिक वेळ घालवू लागली. त्याच दरम्यान तिची ओळख टिकटॉकवरील एका युवकासोबत झाली. या युवकाने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्याने बोलावल्यानंतर विद्यार्थिनीने घरातून पळून जाऊन थेट लखनऊ गाठले.

चारबाग रेल्के स्थानकात या दोघांच्या वगण्या-बोलण्यावर संशय आल्यानंतर जीआरपीच्या जवानांनी त्यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान विद्यार्थिनी घरातून पळून आल्याचे लक्षात येताच जीआरपीने विद्यार्थिनीला बाल कल्याण समितीकडे सोपवले. जीआरपी स्थानक अधिकारी सोमकीर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, युवकाच्या घरच्यांना या प्रकाराबाबत माहिती देण्यात आली आहे, मात्र अद्याप त्याच्या कुटुंबातील एकही सदस्य युवकाला घेऊन जाण्यासाठी आला नसून त्याला जीआरपी चौकीत ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या