लातूरमध्ये लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळवले

1031

लातूरच्या शिरुर अनंतपाळ तालूक्यातील थेरगाव येथे अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीविरोधात शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीच्या भावाने तक्रार दाखल केली आहे. आपण आई, बहिण आणि भाऊ थेरगाव येथे राहतात. 20 मार्चला रात्री 9 वाजता सर्वजण जेवण करुन झोपले होते. सकाळी उठल्यानंतर आईला मुलगी दिसली नाही. तिचा गावात, नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतू ती सापडली नाही. त्यामुळे घरच्यांनी मोठ्या भावाला गावात बोलावले. त्यानंतर तक्रारदार गावी गेला. गावात चौकशी केली असता गावातील आकाश महादू कांबळे याने लग्नाचे अमिष दाखवून मुलीला पळवून नेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आकाश कांबळेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या