लातूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीला अज्ञात व्यक्तीने पळवले

1194

लातूर येथील एका वसतीगृहात राहणाऱ्या इयत्ता आठवीत शिक्षणाऱ्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील मुलगी शिक्षणासाठी लातूर येथे एका वसतीगृहात राहात होती. ती मुलगी राहात असलेल्या खोलीमध्ये राहणाऱ्या मुलीसोबत ती खंडोबाच्या मंदिरात देवदर्शनासाठी गांजूर येथे गेलेली होती. 20 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता त्या दोघी लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात आल्या होत्या. मैत्रिणीला तू वसतीगृहात जा, मला वडिलांनी बोलावले आहे, मी गावाकडे जात आहे असे, म्हणून ती मैत्रिणीला रिक्षात बसवून परत मध्यवर्ती बसस्थानकात गेली. मैत्रिणीने परत तिला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्या मैत्रिणीने मुलीच्या आईला फोन करुन मुलगी गावाकडे आली आहे का याची विचारणा केली. मुलीचा मोबाईल बंद येत होता, ती नातेवाईकांकडेही सापडली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याची तक्रार तिच्या आईने दाखल केली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या