बॉयफ्रेंडला भेटायला निघाली म्हणून आईवडिलांनी केली मुलीची हत्या, मृतदेहाचे केले तुकडे

2341

बॉयफ्रेंडला भेटायला निघाली म्हणून रागाच्या भरात आई वडिलांनी त्यांच्या 15 वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद जिल्ह्यात घडली आहे. त्यानंतर त्यांनी तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते शेतात गाडून टाकले. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या पालकांना अटक केली आहे.

प्रभा असे त्या मृत मुलीचे नाव असून ती तिचे वडिल नितेश व आई गुड्डूसोबत राहायची. सोमवारी प्रभा तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला निघाली होती. तिच्या पालकांना ते समजले तेव्हा प्रभा व त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर नितेशने प्रभाचा गळा घोटला व तिची हत्या केली. त्यानंतर कुणाला समजू नये म्हणून त्यांनी सोमवारी रात्री मुलीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते शेतात पुरले. दरम्यान शेजारी राहणाऱ्या काही जणांना प्रभा अचानक दिसेनाशी झाल्याने संशय आला. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलीस घरी आले तेव्हा गुड्डू एकटीच घरी होती. तिने मुलगी व पती बाहेर गेल्याची थाप मारली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच गुड्डूने सर्व सत्य सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोहम्मदाबाद गावातून नितेशला देखील अटक केली

आपली प्रतिक्रिया द्या