अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवले

42

सामना प्रतिनिधी । वलांडी

येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले आहे. मुलीच्या वडीलांनी देवणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

वलांडी येथील राम मंदीरातील पुजारी रमेश पांडे यांची अल्पवयीन मुलगी ही दि. २७ रोजी शाळेतील टि. सी. मार्कमेमो घेऊन येते म्हणून घरातून गेली असून ती अद्याप परतली नाही. सर्वत्र चौकशी करूनही तिचा शोध लागत नाही. अखेर मुलीचे वडील रमेश पांडे यांच्या तक्रारी वरून देवणी पोलीसांनी फिर्याद नोंदवून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलगी कोठे आढळल्यास देवणी पोलीसांशी संपर्क साधण्याचे देवणी पोलीसांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या