बॉयफ्रेंडसोबत झाले भांडण, अल्पवयीन मुलीची तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

मध्य प्रदेशमध्ये एका अल्पवयीन मुलीने हॉटेलेच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मुलीचे आपल्या बॉयफ्रेंडसोबत भांडण झाले होते त्यामुळे तिने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

उज्जैन शहरात एक अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन मुलगी यांनी एका हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. दोघांनी आपले खोटी कागदपत्रे दिली होती, तसेच आपले लग्न झाल्याचेही खोटे सांगितले होते.  हॉटेलमध्ये मुलाचे काही मित्रही आले होते. परंतु मुलगी आपल्याला धोका देत असल्याचे प्रियकराला वाटले. तसेच मुलीचे आपल्याच मित्रासोबत अफेअर असल्याचा मुलाने संशय घेतला. यावरून दोघांमध्ये वाद आणि भांडणेही झाले. प्रियकराने त्याच्या प्रेयसीला मारहाणही केली. हॉटेलमधील उपस्थित लोकांनी हा तमाशा पाहिला. या घटनेमुळे मुलगी खूपच अस्वस्थ झाली.

रविवारी रात्री बाराच्या सुमारास मुलीने हॉटेलच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. तसेच कुठलीही खातरजमा न करता अल्पवयीन मुलांना रूम दिल्याबद्दल हॉटेल मालकालाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या