अल्पवयीन मुलीची गोळ्या झाडून आत्महत्या

38

सामना ऑनलाईन । बारामती

बारामती शहरात अल्पवयीन मुलीनं गोळ्या झाडून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय मुलीनं रिव्हॉस्व्हवरनं स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे. बारामती शहरातील सूर्यनगर भागात ही घटना घडली आहे.

सायली उर्फ संध्या मानसिंह असं आत्महत्या करणाऱ्या १७ वर्षीय मुलीचं नाव आहे. सायली गेल्यावर्षी शिक्षणासाठी बारामतीमध्ये आली होती. मात्र शनिवारी रात्री सायलीनं गावठी रिव्हॉल्व्हरनं डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सायलीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सायलीनं नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या