माझ्यावर झाला सामूहिक बलात्कार; घरी उशीरा परतल्याने तरुणीचा बनाव

1696

हैदराबादमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने सारा देश हादरला होता. यामुळे देशभरात महिला प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातचं हैदराबादमधील एका मुलीने घरी उशीरा परतल्याने सामूहिक बलात्कार झाल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांसमोर बनाव उघडकीस आल्यावर मुलीने पोलिसांची माफी मागितली.

हैदराबादच्या संगारेड्डीमधील 16 वर्षीय मुलगी आईशी घरातल्या पैसे चोरी प्रकरणावरून भांडून प्रियकरासोबत घरातून निघून गेली होती. अनेक तास झाले तरी घरी न आल्याने, तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. त्यानंतर मुलगी रात्री उशीरा घरी परतली. उशीरा घरी परतल्याचे कारण तिने आपल्यावर अमीनपुरात सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्य़ा कुटुंबीयांनी पोलिसात स्थानकात तक्रार केली.

मुलीने घटना कुटुंबियांना ऐकवल्यानंतर तिला कुटुंबीयानी पोलीस स्थानकात तक्रारीसाठी नेले. त्यावेळी तिने पोलिसांना सांगितले, “मी रागाने घराबाहेर निघून गेली. त्यानंतर रस्त्यावर एकटं चालत असताना एक बाईक स्वार माझा पाठलाग करत होता. त्यामुळे मी त्या बाईक स्वाराला कानशिलात लगावली आणि त्यानंतर तो तेथून निघून गेला. मात्र काही वेळाने पुन्हा आला. त्यानं माझ्याजवळ तुझा अश्लिल व्हिडिओ असल्याचे सांगून,तो इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली. त्यामुळे मी त्याचासोबत गेली. अमीनपूर येथे गेल्यावर माझ्यावर चौघांनी सामूहिक बलात्कार केला.” मुलीच्या जबानीवर पोलिसांनी तपास सूरु केला. तिच्या वैद्यकीय चाचणीत मात्र तिच्यावर बलात्कार झालाच नसल्याचं निष्पण्ण झालं. संगारेड्डीचे पोलीस अधिकारी चंद्र शेखर रेड्डी यांनी मुलीची चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळी तिने प्रियकराबरोबर फिरायला गेल्याचे सांगितले. रात्री उशीरा घरी परतल्यामुळे सामूहिक बलात्काराचा बनाव रचला. खोट समोर आल्यावर तिनं कुटंबांची आणि पोलिसांची माफी मागितली. पोलिसांनीही मुलीला समज देऊन सोडून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या