एका मिस कॉलने आयुष्य उध्वस्त झाले , उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

प्रियकराच्या प्रेमात हरवून गेलेली एक अल्पवयीन मुलगी लग्न करून आयुष्यभर सोबत राहण्याची स्वप्न पाहात होती. त्याच प्रियकराने तिचा केसाने गळा कापला. लग्न करण्यासाठी ती त्याच्याबरोबर आपल्या कुटुंबियांना सोडून दिल्लीला पळून आली आणि तिच्या आयुष्यातील वाईट काळ इथेच सुरू झाला.

मुजफ्फरपूर येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी रजनीश वर्मा नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. एका मिस कॉलमुळे या दोघांची ओळख झाली. दोघांमधलं संभाषण वाढलं आणि ओळख वाढत गेली. या तरुणीला आपण रजनीशच्या प्रेमात कधी पडलो, हे कळलच नाही. रजनीशच्या मनात मात्र काहीतरी भलतच होतं. ही तरुणी रजनीशसोबत लग्न करण्यासाठी पाटण्याहून दिल्लीला पळून आली. दिल्लीला आल्यानंतर रजनीशने या अल्पवयीन मुलीला आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली.

रजनीशने या तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्याच्या नकाराने हादरलेल्या तरुणीला खरा धक्का त्यानंतर बसला. रजनीशने या तरुणीला देहविक्रय करण्यास भाग पाडले. त्याने स्वत:चे दोन मित्र बोलावले आणि या तरुणीसाठी दलाल काम करायला सुरुवात केली.

रजनीशने नोएडा येथे एक गेस्ट हाऊस बुक केले होते. नोएडातील सेक्टर 12 येथे एका गेस्ट हाऊसमध्ये सेक्स रॅकेट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार 27 फेब्रुवारीला पोलिसांनी या गेस्ट हाऊसवर छापा घातला. छाप्यादरम्यान पोलिसांनी पिडीतेची सुटका केली आणि रजनीशसह त्याच्या मित्रांना अटक केली. पीडितेच्या कुटुंबियांनाही ती नोएडा येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी कळवली आहे, मात्र चार दिवस उलटून गेल्यानंतरही तिचे कुटुंबिय अजूनही नोएडा येथे पोहोचलेले नाहीत. तिच्या कुटुंबियांसमोर खऱ्या घटनेचा उलगडा होईपर्यंत तिला नारी निकेतन येथे ठेवण्यात आले आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, रजनीशने पीडितेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले होते. त्याने तिला धमकी दिली होती की, जर तिने त्याचं ऐकलं नाही तर तो पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडीयो सोशल मिडियावर व्हायरल करेल. रजनीशने पीडितेच्या कुटुंबियांचीही बदनामी करण्याची धमकी दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या