पुन्हा लव्ह जिहाद, मुस्लीम मुलाने हिंदू अल्पवयीन मुलीला पळवले

50

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूरमध्ये लव्ह जिहादचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. तालुक्यातील डिगोळ येथील एका मुस्लीम मुलाने आंबेवाडी येथील एका  हिंदू अल्पवयीन  मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथील जुबेर आमिनसाब मुंजेवार (१७) या मुलाने आंबेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. ६ जुलै रोजी दुपारी एक वाजता सदर मुलगी जुबेरसोबत मोटारसायकलवर बसून पळून गेली. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी जुबेर व त्याचे दोन मित्र रहीम पटेल व मंगेश जांबळे यांच्याविरोधात पोलीसात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलीचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक शैलेश बंकावाड या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे

आपली प्रतिक्रिया द्या