महिलेचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या अभिनेत्याला अटक

4752

परदेशात राहणाऱ्या एका महिलेचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या एका अभिनेत्याला मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. राज सिंग असे त्या अभिनेत्याचे नाव असून तो मीरा रोडचा आहे. राजने न्यूयॉर्क येथील तरुणीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेत तिच्याकडून तिचे अश्लील व्हिडीओ मिळवले होते.

न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या या तरुणीची फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावरून राज सिंग सोबत ओळख झाली होती. त्यानंतर ते दररोज मोबाईलवरून चॅट करू लागले व काही काळातच ते ऐकमेकांच्या प्रेमात पडले. त्याचाच फायदा घेत राजने त्या तरुणीकडून तिचे काही खासगी व्हिडीओ व फोटो मागवून घेतले होते. जवळपास आठ महिने एकमेकांशी बोलत असल्याने त्या तरुणीने राजला तिचे खासदगी व्हिडीओ पाठवले. मात्र फोटो व व्हिडीओ मिळताच राजने त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. सप्टेंबर महिन्यात राजने त्या तरुणीला पहिल्यांदा धमकी दिली. ‘पैसे पाठव नाहीतर तुझे हे व्हिडीओ व फोटो तुझ्या घरच्यांना, नातेवाईकांना व मित्र मंडळींना पाठवेन’ अशी धमकी त्याने दिल्यानंतर त्या तरुणीच्या पायाखालची जमिनच सरकली. त्या तरुणीने थोडे थोडे करत आतापर्यंत 10 हजार डॉलर्स म्हणजेच तब्बल सात लाख रुपये राजला पाठवले. मात्र नंतर तिने पैसे पाठविण्यास नकार दिला. त्यामुळे राजने तिचा एक व्हिडीओ तिच्या मित्राला पाठवला. त्यामुळे राजविरोधात त्या तरुणीने इमेलद्वारे मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या नंतर पोलिसांनी राजला त्याच्या घरातून अटक केली आहे.

राजच्या मोबाईलमध्ये सापडलेले व्हिडीओ व फोटोग्राफ, राजचे त्या तरुणीसोबतचे चॅट्स तसेच राजने त्या तरुणीच्या मित्राला पाठविलेला व्हिडीओ या आधारे त्याच्याविरोधात भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या