‘मिरची’ तोंड गोड करणार, रक्षाबंधनासाठी विशेष सोय

बहीण मायेने भावाच्‍या मनगटावर राखी बांधत त्‍याला गोड मिठाई भरवते. भाऊ तिला भेटवस्‍तू देण्‍यापूर्वी कशाप्रकारे तिची मस्‍करी करतो? हे क्षण आठवतात ना! कोरोनाचे संकट आणि वेगळे शहर वा वेगळा देशात वास्तव्य यांसारख्‍या घटनांमुळे रक्षाबंधन पारंपारिक पद्धतीने साजरा करताना अडचण निर्माण झाली आहे. मात्र यावर मात करत Mirchi.com यंदाचा सण साजरा करता यावा म्हणून पुढाकार घेतला आहे.

कोविड-19 मुळे निर्माण झालेली आव्‍हानात्‍मक स्थिती पाहता Mirchi.com ने यंदाच्‍या रक्षाबंधन सणासाठी अद्वितीय ऑफरची घोषणा केली आहे. Mirchi.com ने बहिणींना भावांसाठी राखी पाठवण्‍याचे काम अगदी सुलभ व सोईस्‍कर केले आहे. बहिण Mirchi.com च्‍या माध्‍यमातून घरातून बाहेर न पडता ड्रायफ्रूट्स किंवा मिठाईसह राखी पाठवू शकते. फक्‍त एवढेच नाही, Mirchi.com ने बहिणींना खास क्षणाचा फोटो व वैयक्तिक संदेशासह राखी पाठवत भावांना अचंबित करण्‍याची सुविधा देखील दिली आहे. हे अद्वितीय गिफ्ट या महामारीदरम्‍यान निश्चितच कोणत्‍याही भावाच्‍या डोळ्यांमध्‍ये आनंदाश्रू आणतील.

राखी गिफ्ट बॉक्‍सेसबद्दल बोलताना Mirchi.com च्‍या संस्‍थापिका व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती पूर्णिमा मितल म्‍हणाल्‍या, ‘आमची या अद्वितीय राखी गिफ्ट बॉक्‍सेसच्‍या माध्‍यमातून बहिण-भावामधील पवित्र नात्‍याला अधिक घट्ट करण्‍याची इच्‍छा होती. काळ कदाचित बदलला असेल, पण बहिण-भावामधील प्रेम कधीच बदलणार नाही किंवा कोमेजून जाणार नाही. सध्‍याची महामारी देखील पारंपारिक पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्‍याला रोखू शकत नाही. Mirchi.com ने सादर केलेल्‍या राखी गिफ्ट बॉक्‍सेससह आम्‍हाला विश्‍वास आहे की, प्रत्‍येक कुटुंब यंदाचा रक्षाबंधन सण उत्‍साहाने व आनंदाने साजरा करेल.’

आपली प्रतिक्रिया द्या