आरसा

4382

आपल्या घरातील आरसा फक्त आपले प्रतिबिंब दाखवत नाही तर आपल्या जगण्यावरही त्याचा खोलवर परिणाम होतो.

आरसा… आपण जसे आहोत तसे आपल्याला दाखविणारा आरसा. सौंदर्यसाधना आरशाशिवाय पूर्ण होत नाही. बिजोरी आरसा, नितरळ, पारदर्शक आरसा. आपले सौंदर्य दाखवत असताना स्वतः आरसाही नितांत देखणा दिसत असतो, पण आरशाचा हा प्रतिबिंबीत करण्याचा गुणधर्म आपल्या संपूर्ण जगण्यावरही प्रभाव टाकत असतो.

स्वयंपाकघरातील भिंतीवर लावलेल्या मोठय़ा आरशांना ऊर्जेचे अद्भुत स्रोत मानले जाते. डायनिंग टेबलाला प्रतिबिंबित करणारा आरसा हा त्या टेबलावर ठेवलेल्या अन्नपदार्थांची वाढ होत आहे, असे दर्शवितो. डायनिंग टेबलासमोर लावलेला आरसा फेंगशुई शास्त्रनुसार उत्तम भोजनाकरिता चांगला उपाय आहे.

आरसा कधीही तुटलेला, टोकदार किंवा धुरकट नसावा. आरशात  प्रतिबिंब कधीही अव्यवस्थित दिसू देऊ नये. कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्या आरशात आपण आपला चेहरा नीट पाहू शकतो अशा आरशामुळे आपल्या भोवतीचे प्रभामंडल (ऑरा) प्रभावित होते.

वास्तुशास्त्रनुसार आरशाची फ्रेमही महत्त्वपूर्ण मानली जाते. जिथे फ्रेमचा आरसा वापरला जातो त्या ठिकाणच्या ऊर्जेत दुप्पट वेगाने वाढ होते. म्हणून आरशाच्या फ्रेमचा रंग लालभडक, दाट नारंगी नसावा. त्याऐवजी निळा, हिरवा, पांढरा, क्रीम असा असावा.

आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणे शुभ असते. या दिशांना गोल आरसा कधीच लावू नये. कारण गोल आरशात संपूर्ण ऊर्जा केंद्रित होते. तसेच आरसा जेवढा हलका आणि मोठा तेवढा त्याचा प्रभाव जास्त असतो.

आरसा फुटणे अशुभ मानले जाते. फुटलेला आरसा लगेच घरातून काढून टाकावा. शक्यतो घरात टोकदार आणि तुटलेला आरसा लावू नये.

दुकान आणि शोरूममध्ये छतावर आरसे लावले जातात. दुकान आणि शोरूममधील छतावर ईशान्य दिशेला आणि मध्यभागी आरसा लावू नये. आरशाची फ्रेम तुटल्यास तत्काळ दुरुस्त करून घ्यावी किंवा आरसा तुटल्यास त्वरित बदलावा.

बेडरूममध्ये आरसा लावणे अशुभ असून त्यामुळे पती-पत्नीला स्वास्थ्यसंबंधित विकार निर्माण होण्याची शक्यता असते. हा एक वास्तुदोष समजला जातो. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा हानी होते.

घरात लावलेल्या आरशातून सतत ऊर्जा बाहेर पडत असते. ही ऊर्जा सकारात्मक की नकारात्मक हे आरसा ज्या जागी लावला आहे त्यावरून समजते.

आरशातून येणारी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तो झाकून ठेवा किंवा कपाटातील आतील बाजूस लावा. बेडरूममध्ये लावलेला आरसा पती-पत्नीच्या घटस्फोटाचे कारण बनू शकतो.

घराच्या दरवाजाच्या आतील बाजूला आरसा लावू नये. तसेच घरातील अतिशय छोटय़ा जागी आरसा ठेवणेही धोकादायक असते.

आरशात शुभ वस्तूचं प्रतिबिंब पडेल अशा जागी आरसा लावा. खिडकी किंवा दरवाजाचे प्रतिबिंब त्यामध्ये पडेल त्या ठिकाणी तो लावू नका. उत्तर दिशेतील भिंतीवर लावलेल्या आरशातून बाहेर पडणारी ऊर्जा घरातील सदस्यांना सुरक्षित ठेवते.

घरातील भिंतींवर समोरासमोर आरसा लावल्याने कुटुंबीयांमध्ये बेचैनी निर्माण होते. तुम्हाला हव्या असलेल्या आकारात आरसा कापून त्याचा उपयोग करू नका.

जर तुमच्या घराबाहेर इलेक्ट्रिक पोल, उंच इमारत, वृक्ष आहेत तर त्याच्या समोर आरसा लावा.

कोणत्याही भिंतीवर आरसा लावताना तो नेहमी खूप खाली किंवा खूप उंचावर लावू नये. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

घरातील ईशान्य दिशेला उत्तर किंवा पूर्व दिशेला असलेल्या वॉश बेसिनवर आरसा लावणे शुभदायक असते.

जर घराच्या दरवाजासमोर रस्ता दिसत असेल आणि दरवाजाची दिशा बदलणे शक्य नसेल अशा वेळी दरवाजावर पाखुँआ आरसा लावा. पाखुँआ आरसा हे शक्तिशाली वास्तूचे प्रतीक आहे, मात्र हा लावताना सावधानता बाळगणेही गरजेचे आहे. हा आरसा लावताना शेजाऱयांच्या घराला केंद्रित करून लावू नका.

कारखान्यात दक्षिण-पश्चिम दिशेला भिंतीवर लावलेल्या आरशामुळे व्यापारात घट निर्माण होऊ शकते. असे आरसे त्वरित काढावेत किंवा त्यावर कागद लावावा. या उपायामुळे कर्ज, उधारी असे अडथळे दूर होतील.

घरातील काही भाग अंधारयुक्त किंवा असामान्य आकार असलेला असेल तर तिथे गोल आरसा लावा. घराच्या मध्यभागी आरसा लावू नका. त्यामुळे धनाचा नाश होण्याची शक्यता असते.

पूर्व आणि उत्तर दिशेला कोपऱयात कपाट बनवून त्यातील उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा लावल्याने खूप लाभ होतात.

उत्तर-पूर्व दिशेला षटकोन किंवा अष्टकोनी आरसा लावल्यास धनलाभ होतो, मात्र षटकोन आणि अष्टकोन असलेले आरसे इतर दिशांकरिता हानिकारक आहेत.

अष्टकोन आरसा हा आठ दिशांच्या ऊर्जेचे प्रतीक आहे. त्यामुळे तो पॅसेज किंवा गॅलरीमध्ये लावल्यास आठ दिशांची ऊर्जा प्राप्त होते.

दक्षिण-पूर्व म्हणजे अग्निकोनात आरसा लावू नये.  त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते.

आपली प्रतिक्रिया द्या