अगडबंब शरीरामुळे लग्न मोडले, आता एवढी हॉट झाली की जिंकली सौंदर्य स्पर्धा

2231

प्रचंड जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अशक्य ते शक्य करून दाखवणारे फारच थोडे असतात. आता पाहा ना कोणे एकेकाळी अगडबंब थुलथुलीत शरीरामुळे लग्न मोडलेल्या एका तरुणीने स्वत:मध्ये एवढा बदल घडवून दाखवला की थेट सौंदर्य स्पर्धाच जिंकली. जेन एटिक असे या 26 वर्षीय तरुणीचे नाव असून तिने ‘मिस ग्रेट ब्रिटन 2020’ ही मानाची स्पर्धा जिंकली आहे.

काही वर्षांपूर्वी कोणी मला तू मिस ग्रेस ब्रिटन बनशील असे म्हटले असते तर मी त्यावर विश्वास ठेवला नसता, असे स्पर्धा जिंकल्यानंतर जेन एटिक म्हणाली. जेन हिने गेल्या दोन वर्षांमध्ये 100 पाऊंड अर्थात जवळपास 46 किलो वजन कमी केले आहे. अगडबंब थुलथुलीत शरीरामुळे लग्न मोडल्यानंतर जेनने काहीतरी करून दाखवणारच असा पण केला होता. त्यानंतर जेनने खाण्यापिण्यावर नियंत्रण मिळवले, नियमित व्यायाम केला. याचा परिणाम असा झाली की ती आधीपेक्षा खूपच हॉट दिसू लागली आणि आज ती ‘मिस ग्रेट ब्रिटन 2020’ आहे.

miss-great-britain-2020-1

जेन म्हणते, काही वर्षांपूर्वीचे आणि आताच्या आयुष्यामध्ये दिवस-रात्रीसारखा फरक आहे. मी खूप चांगले जेवण घेते, डायटही फॉलो करत नाही. मात्र मी जास्त खाते तरी काय असा विचार करते आणि खाण्याचा आनंदही घेते, असेही ती म्हणाली. तसेच आठवड्यातून पाच दिवस जीममध्ये घाम गाळते आणि मला ते आवडायला लागले आहे. जीमला जाणे, व्यायाम करणे हा आता माझ्या जीवनाचा भाग बनला आहे, त्याच्यामुळे मला प्रचंड मदत झाली, असे जेनने सांगितले.

जेन इन्स्टाग्रामवरही प्रचंड सक्रिय असते. हजारो फॉलोअर्स असणाऱ्या जेनने गडबंब थुलथुलीत शरीर ते एक हॉट तरुणी हा बदल कसा घडवला यासाठी तुम्ही तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टही पाहू शकता. ती सुरुवातीला प्रचंड जाड होती. जवळपास 100 किलोच्या आसपास वजन असणाऱ्या जेनला यामुळे टोमणेही ऐकूण घ्यावे लागायचे. परंतु दोन वर्षांमध्ये तिने मेहनत घेऊन जवळपास 46 किलो वजन कमी केले. तसेच व्यायाम करण्यासोबतच आपल्याला गाणी ऐकायला आणि म्हणायला आवडते, असेही जेनने सांगितले.


View this post on Instagram

Less than 6 weeks until the @missgb_official finals – the 75th Anniversary final what an incredible honour to be part of such a huge event! What’s my story? Well, after years of being obese, unhealthy and uncomfortable I found motivation and managed to lose 8 stone. It transformed me into an ambitious and hard working person in all areas of my life; achieving something so incredible changed my mindset and made me realise if I worked hard enough for something, I could achieve it. Believe in yourself, put the hard work in, stay positive and make your own dreams a reality ✨ #motivation #weightloss #transformation #missgbfinalist #begreat #hardwork #misslincolnshire #beautyqueen #misconception #happiness #health #healthybodyhealthymind

A post shared by Jen Atkin (@jenatkinuk) on

आपली प्रतिक्रिया द्या