मिशन मंगलचा जबरदस्त ट्रेलर लॉन्च, काही मिनिटांत लाखो हिट्स

50

सामना ऑनलाईन । मुंबई

‘There is no science without experiment’ या उक्तीसह इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना जगासमोर आणणारा ‘मिशन मंगल’ चा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला. अभिनेता अक्षय कुमार हा प्रमुख भूमिकेत दिसणार असून तापसी पन्नू, शर्मन जोशी, विद्या बालन, कीर्ती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन हे सहकलाकार देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्रेलर पोस्ट केला असून 2 मिनिटे 52 सेकंदांच्या या ट्रेलरला नेटकऱ्यांच्या लाखो हिट्स मिळाल्या आहे.

आपली प्रतिक्रिया द्या