टाटा पॉवरचे मिशन सोलर,घराच्या छतावर उभारणार सौर पॅनल

सामना ऑनलाईन, मुंबई

सौरऊर्जेच्या निर्मितीसाठी टाटा पॉवरने मिशन सोलर सुरू केले असून त्याची सुरुवात आज झाली. त्यानुसार ग्राहकांच्या घरावर सौरऊर्जा पॅनल उभारून वीज निर्मिती केली जाणार आहे. या विजेमुळे ग्राहकांच्या वीज बिलात वार्षिक 50 हजार रुपयांपर्यंत मोठी बचत होणार आहे.

टाटा पॉवर सोलर निवासी घरांच्या छतावर सौर पॅनल उभारून ऊर्जानिर्मिती करण्यास प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी अर्थसहाय्यही दिले जाणार आहे. फोटोव्होल्टॉक तंत्रज्ञानावर आधारित उभारले जाणार असून ते 25 वर्षांपर्यंत चालणार असल्याचे टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर सिन्हा यांनी सांगितले. ग्राहकांनी 18004198777 या टोल फ्रीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.