मिचेल स्टार्क जायबंदी, उर्वरित कसोटी मालिकेस मुकणार

सामना ऑनलाईन, मुंबई

अष्टपैलू मिचेल मार्श दुखापतीमुळे मायदेशी परतल्याने आधीच धक्का बसलेल्या ऑस्ट्रेलियाला शुक्रवारी दुहेरी धक्का बसला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही उजवा पाय फ्रॅक्चर झाल्याने तो हिंदुस्थानविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेस मुकणार आहे.

बंगळुरू कसोटीतील पराभवानंतर पायाचे दुखणे न थांबल्याने मिचेल स्टार्कच्या पायाचा स्कॅन करण्यात डॉक्टरांच्या अहवालात फ्रॅक्चर झाल्याने समोर आल्याने ऑस्ट्रेलियन संघाला जबर धक्का बसला. कारण आधीच खांद्याच्या दुखापतीमुळे मिचेल मार्शला मालिका सोडून मायदेशी परतावे लागले. आता जायबंदी झालेला मिचेल स्टार्कही मायदेशी परतणार असल्याने ऑस्ट्रेलियन संघाच्या गोलंदाजीची धार निश्चितच कमी झाली आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचे फिजियो डेव्हिड बेकली म्हणाले, मिचेल स्टार्कला दुसऱ्या कसोटीदरम्यानच पायाला वेदना होत होती. त्याला वाटले पाय मुरगळला असेल. दोन-तीन दिवसांत बरे होईल. मात्र वेदना न थांबल्याने त्याच्या पायाचे स्कॅन करण्यात आले. त्यात हाड मोडल्याचे स्पष्ट झाले. आता जॅकसन बर्ड या वेगवान गोलंदाजला अंतिम अकरामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या