वाढदिवसाच्या दिवशीच मिथुनदांची पोलिसांकडून ऑनलाइन चौकशी

अभिनेते आणि भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांची बुधवारी  त्यांच्या वाढदिवसादिवशीच बंगाल पोलिसांनी चौकशी केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त भाषणांसंदर्भात ही चौकशी करण्यात आल्याचे समजते. भाजपचे स्टार प्रचारक असलेल्या मिथुन यांची ऑनलाइन चौकशी करण्यात आली. त्यांच्यावर 7 मार्च रोजी पक्षात सामील झाल्यानंतर वादग्रस्त भाषण केल्याचा आरोप आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी ही एफआयआर रद्द करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने चौकशीसाठी एका विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यांच्या  चौकशीचे आदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या