सलाम! आधी झुंझार खेळ, नंतर चिमुकल्याला मैदानातच केले स्तनपान

1474

मुलांच्या जन्मानंतरही बॉक्सिंगच्या रिंगमध्ये ‘सुवर्ण’ठोसा लगावणारी हिंदुस्थानच्या मेरी कोम हिच्याबाबत सर्वांना माहिती नाही. तिच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचीही निर्मिती झाली. मुलांचा सांभाळ करताना देशासाठी क्रीडा क्षेत्रात योगदान देणे किती कठिण असते याचा प्रत्यय मिझोराममधील स्पर्धेतील व्हायरल होणाऱ्या फोटोवरून करू शकता.

बाळंतपणानंतर अवघ्या काही महिन्यांतच खेळाच्या मैदानात उतरलेल्या आईचे अनोखे या फोटोतून दिसते. महिला खेळाडूने व्हॉलीबॉल सामन्याच्या हाफ टाईममध्ये चिमुकल्याला स्तनपान केले. या प्रेरणादायी घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या महिला खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मिझोरामची राजधानी ऐझालमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. व्हॉलीबॉल सामन्यात ललवेंटुआंगी ही माता सहभागी झाली होती. सामन्यात आक्रमक खेळी करत आपल्या संघाला जिंकवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या ललवेंटुआंगी हिने हाफ टाईममध्ये आपल्या चिमुकल्याला स्तनपान केले आणि त्याची भूक भागवली. मैदानात ही दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या खेळाडूवर नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मिझोरामचे क्रीडामंत्री रॉबर्ट रोमाविया रोयते यांनी ललवेंटुआंगी हिला 10हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा केली आहे. ऐझाल फुटबॉल क्लबनेही तिच्या ममत्वाला सलाम ठोकला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या