#Metoo एमजे अकबर म्हणतात, मला काहीच आठवत नाही

102

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमाणी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्या प्रकरणी आज अकबर यांनी न्यायालयात त्यांचा जबाब नोंदवला. यावेळी रमाणी यांच्या वकिलाने विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी मला काहीच आठवत नाही, असे उत्तर दिले.

जवळपास दोन तास न्यायालयात त्यांची चौकशी सुरू होती. यावेळी अकबर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले. तसेच रमाणी यांनी केलेले आरोप हे दुर्देवी व मानहानीकारक असल्याचे म्हटले आहे. रमाणी यांनी अकबर यांच्यावर 20 वर्षांपूर्वी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अकबर यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला होता.

आपली प्रतिक्रिया द्या