आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या गाडीला अपघात

17

सामना प्रतिनिधी । नागपूर

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या गाडीला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कारंजा टोल नाक्यासमोर अपघात झाला. अपघातात अनिल बोंडे यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा वाहन चालकही जखमी झाला आहे. डॉ. अनिल बोंडे शुक्रवारी मुंबईहून नागपूरला विमानाने आले. त्यानंतर अमरावतीला आपल्या इनोव्हा गाडीने निघाले असता कारंजा टोल नाक्याजवळ मोठय़ा प्रमाणात पाऊस सुरू झाला. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी तीन ते चारवेळा पलटली.

अपघातात डॉ. बोंडे यांच्यासह त्यांचा चालक गंभीर जखमी झाला आहे. दोघांवर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून डॉ. बोंडे यांची प्रकृती स्थिर आहे.या संदर्भात अनिल बोंडे यांच्याशी संपर्क साधला असता कारचे समोरचे चाक जाम झाल्यामुळे वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कारने पलटी खाल्ली. या अपघातात माझ्या खांदाला थोडी दुखापत झाली आहे तर ड्रायव्हरच्या पाठीला दुखापत झाली असल्याचे आ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या