सांगलीचे आमदार मोहनराव कदम यांच्यासह कुटुंबातील 8 जणांना कोरोनाची लागण

801

सांगलीचे आमदार मोहनराव कदम यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कदम यांच्या आज अहवाल पॉझिटिव्ह आला. आमदार मोहनराव कदम हे दिवंगत मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांचे बंधू तर विद्यमान कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे चुलते आहेत.

आमदार मोहनराव कदम हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. यापूर्वी त्यांच्या सुपुत्राला आणि नातवालाही कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर पुण्यात भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान आज आमदार मोहनराव कदम यांचा अहवाल ही आज पॉझिटिव्ह आला.

सांगली जिल्ह्यात आज अखेर 5788 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यातील 3070 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या