हायस्पीड बोटींवर कारवाईसाठी आमदार वैभव नाईक समुद्रात

1288

मालवण किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी काही दिवसांपासून सुरू आहे. मासळीची लूट करत येथील पारंपरिक मच्छीमारांची जाळीही ट्रॉलर तोडून नेत आहेत. रात्रीच्या वेळी शेकडोच्या संख्येने ट्रॉलर घुसखोरी करत असताना कारवाई करण्यात मत्स्य विभाग असमर्थ ठरत आहे. याची दखल घेत आमदार वैभव नाईक सोमवारी सायंकाळी उशिरा मालवणात दाखल झाले. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, संमेश परब यांना सोबत घेत मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेतून मत्स्य अधिकाऱ्यांसोबत आमदार समुद्रात पाहणीसाठी गेले आहेत.

समुद्र खवळला असतानाही घुसखोरी करणाऱ्या हायस्पीड बोटींवर कारवाईसाठी गस्ती नौका रवाना झाली आहे. त्यामुळे हायस्पीड बोटींवर कोणती कारवाई होते याकडे मच्छीमारांचे लक्ष लागले आहे. रात्रीच्या वेळी सुरू असणारी हायस्पीड बोटींची घुसखोरी रोखण्यासाठी मत्स्य विभागाच्या गस्तीतून समुद्रात उतरण्याची आमदार वैभव नाईक यांची दोन वर्षातील दुसरी वेळ आहे. याआधी अशाच पद्धतीने त्यांनी समुद्रात जाऊन कारवाई केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या