उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या हालचालींची मतदार देणार खबर

46

सामना प्रतिनिधी । पनवेल

पनवेल महानगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पनवेल महानगरपालिका कार्यालयात शिवाय सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी COPed (Ciedtiedzen on Pedatroled) हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. या माध्यमातून मतदार उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आचारसंहिता पथकाला खबर देऊ शकतात.

निवडणूक आयोगाने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पालिका प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामध्ये उमेदवारांनी पैसे, भेटवस्तू किंवा सवलतीचे कुपन वाटप, मद्य वाटप, पिस्तूल बाळगणे हे पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले आहे. यावर निवडणूक संनियत्रण समिती देखरेख ठेवणार आहे. निवडणूक कालावधीत नागरिकांनी गैरप्रकाराची तक्रार कॉप अ‍ॅप्लिकेशनमधून शिवाय आचारसंहिता तक्रार निवारण केंद्रावर ०२२ २७४५०१८१ किंवा १८००२२७७०१ या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी केले आहे. आचारसंहिता तक्रार निवारण केंद्र २४ तास कार्यरत राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या